'या' अभिनेत्रींसोबत हिट होती धर्मेंद्र यांची जोडी;BOX office वरही सुपरहीट, सर्वाधिक काम कोणासोबत केलंय?
अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केलं. प्रेक्षकांनीही या जोड्यांना मनापासून प्रेम दिलं. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रींची नावं ज्यांच्यासोबत धर्मेंद्र यांच्या जोडीला कमाल लोकप्रियता मिळाली.
Continues below advertisement
dharmendra
Continues below advertisement
1/6
धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत ज्या-ज्या अभिनेत्रींसोबत काम केलं, त्या सर्वांसोबत त्यांची जोडी मोठी हिट ठरली आणि आजही प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहे.
2/6
सर्वात प्रथम हेमा मालिनी यांचं नाव घ्यावं लागेल. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी सुमारे 40 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘शोले’, ‘रजिया सुल्तान’, ‘प्रतिज्ञा’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.
3/6
पुढे नाव येतं मुमताज यांचं. धर्मेंद्र आणि मुमताज यांची जोडी त्या काळात जबरदस्त हिट ठरली होती. ‘झील के उस पार’, ‘लोफर’, ‘आदमी और इंसान’ अशा अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं.
4/6
यानंतर येतं दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांचं नाव. मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांनी 7 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘मैं भी लड़की हूं’, ‘काजल’, ‘पूर्णिमा’, ‘चंदन का पालना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची आणि केमिस्ट्रीची विशेष दखल घेतली गेली.
5/6
धर्मेंद्र आणि रेखा यांची जोडीही त्या काळात अत्यंत लोकप्रिय ठरली. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत आपल्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना भारावून टाकलं. ‘गजब’, ‘कर्तव्य’, ‘कसम सुहाग की’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आणि मोठी कमाई केली.
Continues below advertisement
6/6
या यादीच्या शेवटी येतं मोहक अभिनेत्री जीनत अमान यांचं नाव. धर्मेंद्र आणि जीनत अमान यांनीही अनेक यशस्वी चित्रपट दिले. ‘हसीना मान जाएगी’, ‘धर्मवीर’, ‘सम्राट’, ‘यादों की बारात’ हे त्यातील काही प्रमुख चित्रपट. एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनीच सांगितलं होतं की, शूटिंगदरम्यान जीनत अमान त्यांना इंग्रजी शिकवायच्या.
Published at : 25 Nov 2025 02:26 PM (IST)