Dharmendra Net worth: लोणावळ्यातलं लग्झरी फार्महाऊस ते आलीशान रेस्टॉरंट्स; धर्मेंद्र यांचं अब्जावधीचं साम्राज्य, नेटवर्थ ऐकाल तर...

Dharmendra: बॉलिवूडचे ही मॅन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Continues below advertisement

Dharmendra

Continues below advertisement
1/9
Dharmendra Networth: सिनेसृष्टीचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या उत्तम चित्रपटांसाठी आणि अभिनयासाठी ओळखले जातात.
2/9
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे प्रचंड प्रसिद्धी मिळवलीय आणि त्यांनी भरपूर पैसे कमवलेत. तब्बल सहा दशकं इंडस्ट्रीवर राज्य करणारा सुपरस्टार अगदी लग्झरी लाईफ जगत होते.
3/9
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे'मधून त्यांच्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून ते सुमारे 300 चित्रपटांमध्ये दिसले.
4/9
अभिनेत्याचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथील खन्ना तहसीलमधील नसराली गावात झाला. त्यानं आपलं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमधील लुधियाना इथे पूर्ण केलं.
5/9
धर्मेंद्र यांच्या एकूण संपत्तीवर नजर टाकल्यास असं दिसून येतंय की, त्यांनी त्यांच्या मोठ्या हॉटेल्ससह सुमारे 400 कोटी इतकी संपत्ती जमवली आहे.
Continues below advertisement
6/9
2022 मध्ये या अभिनेत्यानं हरियाणातील कर्नाल हायवेवर 'ही-मॅन' नावाचं आणखी एक आलिशान रेस्टॉरंट उघडलंय.
7/9
धर्मेंद्रंनी मुंबईतील लोणावळा इथे 100 एकरचं अलीशान फार्महाऊस देखील खरेदी केलंय. त्यात एक मोठा आणि भव्य स्विमिंग पूल आहे.
8/9
सीए नॉलेजनुसार, अभिनेत्यानं मुंबईत अंदाजे 17 कोटी रुपयांची मालमत्ता देखील खरेदी केली. त्यानं शेतीसाठी 88 लाख रुपये आणि जमिनीत 52 लाख रुपये गुंतवले आहेत.
9/9
धर्मेंद्रंच्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी 1975 चा 'शोले' हा चित्रपट सर्वात लोकप्रिय आहे. त्यांनी 'अपने 2', 'इक्कीस' आणि 'देश के गद्दर' सारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्येही काम केलंय.
Sponsored Links by Taboola