Dharmaveer2 : धर्मवीर 2 हिंदी ट्रेलर लॉन्च; भाईजानच्या दोनच शब्दात शुभेच्छा! काय म्हणाला सलमान?
'धर्मवीर-2'(Dharmaveer2) या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने विशेष उपस्थितीत लावली .सलमानच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपनुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, अशोक सराफ, सलमान खान ही सर्व मंडळी धर्मवीर-2 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित होते.
सलमान खानने अवघ्या दोन शब्दात या सिनेमाला दिल्या शुभेच्छा.जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत पहिल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगलाही उपस्थित होतो,तो सुपरहिट झाला. हा सिनेमा देखील हिट व्हावा अशा शुभेच्छा.जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत शुभेच्छा थांबवल्या.
धर्मवीर-2 या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच कारण,आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत.
पहिल्या सिनेमाच्या उदंड प्रतिसादानंतर हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.धर्मवीर-2 सिनेमा हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रदर्शित केला जाणार आहे.
आनंद दिघे हे म्हणतात की, कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग, हा संवाद, सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे.
धर्मवीर-2 या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तकडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून यांनी काम पाहिले आहे.