Devoleena Bhattacharjee : देवोलीना भट्टाचार्जी रमजान पोस्टमुळे ट्रोल; कपड्यांवरून सोशल मीडियावर टीका
Devoleena Bhattacharjee : देवोलीना भट्टाचार्जी रमजान पोस्टमुळे ट्रोल कपड्यांवरून सोशल मीडियावर टीका

देवोलीना भट्टाचार्जी रमजान पोस्टमुळे ट्रोल; कपड्यांवरून सोशल मीडियावर टीका
1/8
देवोलिना भट्टाचार्जी हि टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/8
ती व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते . सध्या ती रमजानच्या फोटोमुळे ट्रोल होताना दिसत आहे.
3/8
देवोलीनाने शहनवाज शेखशी लग्न केले आहे, तो मुस्लिम धर्माचा आहे. लग्नानंतर देवोलीना अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल झाली आहे.
4/8
मात्र, देवोलीना आणि शहनवाज दोघेही एकमेकांच्या धर्माचा आदर करतात आणि सर्व सण-उत्सव एकत्र साजरे करतात.
5/8
सध्या रमजान सुरू असून, देवोलीनाने आपल्या पती शहनवाज आणि मुलगा जॉयसोबत साजरा केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले.
6/8
हे फोटो पाहून काही लोकांनी या जोडप्याचे कौतुक केले, तर काहींनी देवोलीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
7/8
या फोटोंमध्ये ती पती आणि मुलासोबत टेबलजवळ बसलेली दिसत आहे. टेबलवर फळे आणि पराठे ठेवलेले आहेत. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “हा रमजान काहीसा वेगळा वाटतोय. मी अधिक कृतज्ञता, प्रेम आणि एकत्रितपणाची भावना अनुभवते आहे.”
8/8
एका फोटोमध्ये देवोलीना टी-शर्टमध्ये दिसत आहे , तर दुसऱ्या फोटोमध्ये ती स्लीव्हलेस ड्रेसमध्ये आहे. यावरून काही सोशल मीडिया युजर्सनी तिच्या कपड्यांवर आणि बसण्याच्या पद्धतीवरून ट्रोल केले.
Published at : 22 Feb 2026 04:33 PM (IST)