Anil Kapoor : लग्न झालेलं असूनही अनिल कपूर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडला; जाणून घ्या!

या अभिनेत्रीसोबत संसार थाटण्यासाठी 65 वर्षीय अनिल कपूर पत्नीला सोडण्यास तयार झालेला असं म्हटलं जातं.

अनिल कपूर

1/10
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) गेल्या पाच दशकांपासून बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवत आहे.
2/10
अनिल कपूरने 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनयासह अनिल कपूर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि अफेअर्समुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. अनिल कपूर यांनी आपल्या आयुष्यात अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.
3/10
पण एका अभिनेत्रीसोबत अनिल कपूरचं नाव जोडलं गेलं होतं. या अभिनेत्रीचं नाव किमी काटकर (Kimi Katkar) असं आहे. लग्न झालेलं असूनही अनिल कपूर किमी काटकरच्या प्रेमात पडला होता.
4/10
या अभिनेत्रीसोबत संसार थाटण्यासाठी 65 वर्षीय अनिल कपूर पत्नीला सोडण्यास तयार झालेला असं म्हटलं जातं.
5/10
पाच वर्षांच्या रिलेशननंतर अनिल कपूर सुनीतासोबत लग्नबंधनात अडकला. 1984 मध्ये अनिल आणि सुनीता यांचा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाच्या एक वर्षानंतर अनिल आणि सुनीताने सोनमला जन्म दिला.
6/10
तर 1987 मध्ये त्यांना दुसरी मुलगी झाली. रिया असं तिचं नाव आहे. पत्नी आणि दोन मुलांचा वडील असूनही अनिल कपूर सहकलाकार किमी काटकरच्या प्रेमात पडला. दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली.
7/10
मीडिया रिपोर्टनुसार, अनिल कपूरला किमी प्रचंड आवडायची. त्यामुळे अनेक निर्मात्यांकडे ते तिचं नाव सुचवायचे. ऑनस्क्रीन नव्हे तर ऑफस्क्रीनदेखील दोघे अनेकदा एकत्र दिसून आले आहेत.
8/10
अनिल कपूर आणि किमी काटकर यांनी 'काला बाजार','आग से खेलेंगे','हमला' आणि 'सोने पे सुहागा' सारख्या चित्रपटांत काम केलं आहे.
9/10
अनिल कपूर यांचा पत्नी सुनीतावर प्रचंड विश्वास होता. पण सततच्या अफवांमुळे तिचा स्वत:वरचा ताबा सुटला. अनिल आणि किमीला एकत्र पाहून सुनीताला राग अनावर झाला. त्यानंतर तिने अनिल कपूरला दम दिला. सुनीता मुलांना घेऊन आपल्या माहेरी गेली. पुढे अनिल कपूर यांनी सुनीताला चांगलच मनवलं. त्यानंतर सुनीता पुन्हा सासरी आली. पुढे अनिल कपूर यांनी किमीला दूर केलं.
10/10
अनिल कपूर हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 40 वर्षांपेक्षा अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॅकग्राऊंड डान्सर ते हिरो असा अनिल कपूर यांचा प्रवास होता. चेंबुरच्या चाळीत ते लहानाचे मोठे झाले आहेत. अनिल कपूर आज बॉलिवूडचा लोकप्रिय सुपरस्टार आहे. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. (फोटो : अनिल कपूर इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola