Deool Band 2 Box Office Collection:'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 16 व्या दिवशी Top 5 मध्ये एन्ट्री; आत्तापर्यंत किती कमावले?
मराठी चित्रपटांसाठी हा आकडा लक्षणीय मानला जात असून चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे यावरून दिसून येते
Continues below advertisement

Deool Band 2
Continues below advertisement
1/9
Deool Band 2 Box Office Collection: मराठी चित्रपट सृष्टीतील बहुचर्चित 'देऊळ बंद 2 ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करताना दिसतोय.
2/9
21 मे रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 16 दिवसात चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला. प्रवीण तरडे दिग्दर्शित व लिखित 'देऊळ बंद 2 ' सिनेमाची प्रदर्शना आधीपासूनच प्रचंड चर्चा होती.
3/9
प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या चित्रपटाने जगभरात तब्बल 63.49 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.
4/9
अधिकृत आकडेवारीनुसार चित्रपटाची नेट कमाई 54 कोटी रुपये इतकी झाली आहे . त्यामुळे प्रदर्शनाच्या 16 दिवसात या चित्रपटाने 50 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला.
5/9
पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचा कलेक्शन 30.20 कोटी झालं. दुसरा आठवड्यात 22.40 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले.
Continues below advertisement
6/9
सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठीतल्या टॉप 5 चित्रपटांमध्ये देऊळ बंद 2 चित्रपटाची एन्ट्री झाली आहे.
7/9
सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत 'राजा शिवाजी' (114.8 कोटी) अव्वल स्थानी असून त्यापाठोपाठ 'सैराट' (110 कोटी), 'बाईपण भारी देवा' (92 कोटी) आणि 'वेड' (75 कोटी) आहेत. तर 'देऊळ बंद 2'ने 65 कोटी रुपयांची कमाई करत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.
8/9
देऊळ बंद 2 चित्रपटाने देशभरातून एकूण 27 हजार 886 शोधद्वारे कमाई केली आहे. विशेष म्हणजे ही चित्रपटाच्या एकूण कमाईत संपूर्णपणे भारतीय बाजारपेठेचा वाटा आहे.
9/9
चित्रपटाचा कथानकासह कलाकारांच्या अभिनयाचेही सध्या प्रचंड कौतुक होत असून विकेंडसह वीकडेज मध्येही या चित्रपटाने समाधानकारक कामगिरी केली आहे.
Published at : 06 Jun 2026 10:24 AM (IST)