दशावतारचा धमाका सुरुच, बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई, किती कोटींवर पोहोचला?
Dashavatar movie box office collection : सध्या चर्चेत असलेला दशावतार हा मराठी चित्रपट छप्परफाड कमाई करत आहे.
Dashavatar movie box office collection
1/6
सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळली आहे. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
2/6
मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या झी स्टुडियोज प्रस्तुत 'दशावतार’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. कमाईच्या बाबतीत हा सिनेमा 10 कोटींजवळ पोहोचला आहे. आत्तापर्यंतच्या कमाईचा आकडा 9.5 कोटींवर पोहोचलाय.
3/6
पोस्टरपासूनच चित्रपटाबद्दल निर्माण झालेलं कुतुहल पुढे टिझरमधून अधिकच वाढलं आणि नंतर आलेल्या ट्रेलरमुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली.
4/6
सुरुवातीला तब्बल 325 स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दशावतारचे 600 शोज् होते, शनिवारी हा आकडा 800 वर पोहोचला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 वर पोहोचलेला पाहायला मिळाला. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून 'दशावतार' ला प्रचंड दाद मिळत आहे.
5/6
केवळ मुंबई-पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे बेळगाव, बेंगळुरु, इंदूर, हैद्राबाद आणि गोव्यातही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
6/6
चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून, कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. यासोबतच गाणी, देखावे आणि दिग्दर्शनातील भव्यता ही चित्रपटाची खरी ताकद ठरली आहे.
Published at : 18 Sep 2025 04:57 PM (IST)