भर मंचावर शड्डू ठोकला, दंड बैठक मारल्या, पावणं जेवला काय म्हणत गौतमीने प्रकाश सुर्वेंची दहीहंडी गाजवली
मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसह उपनगरातील अनेक गोविंदा पथक विविध ठिकाणी जाऊन सलामी देत आहेत.
मुंबई उपनगरातील प्रसिद्ध दहीहंडी असलेल्या मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत नृत्यांगणा गौतमी पाटील देखील उपस्थिती लावली.
गौतमी पाटीलने नृत्य करत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.
गौतमीने यावेळी पावणं जेवलात काय?, या गाण्यावर नृत्य केलं.
गौतमीने नृत्य करताना भर मंचावर शड्डू ठोकला, दंड बैठक मारल्या.
गौतमीच्या नृत्यानंतर उपस्थित असणाऱ्या गोविंदा पथकांनी देखील नृत्य करत प्रतिसाद दिला.
मुंबई कार्यक्रम केल्यानंतर गौतमी पाटीलच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
गोविंदा पथकाप्रमाणे मी देखील खूप आनंद लुटला.
यावेळी आज विविध ठिकाणी कार्यक्रम असल्याचं देखील गौतमीने सांगितले.
मागाठाण्यातील कार्यक्रमानंतर नवी मुंबईला जाणार असल्याचं देखील गौतमीने सांगितले.