Mukta Barve : 45 वर्षाची अभिनेत्री मुक्ता बर्वे ही अजूनही सिंगल का? अभिनेत्री म्हणाली..
मुंबई पुणे मुंबई, नाच गं घुमा,लग्न पहावे करुन, डबल सीट यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे (Mukta Barve).
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुक्ताने मालिका आणि नाटकांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतच मुक्ताने तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला आहे.
अनेक गाजलेल्या मालिकांमधूनही मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतच तिच्या नाच गं घुमा हा सिनेमाही प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. पण यशाच्या शिखरावर असतानाही ही अभिनेत्री अजूनही अविवाहितच आहे. याविषयी स्वत: अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
मु्क्ता बर्वेने तिच्या वयाची 40 पार केली आहे. तरीही अद्याप तिने लग्न केलंल नाही. पण ऑनस्क्रिन तिची अनेक कलाकारांसोबत चांगली कमेस्ट्री जुळल्याचं पाहयाला मिळालं आहे.
स्वप्नील जोशी, उमेश कामत, अंकुश चौधरी या कलाकारांसोबत मुक्ताने स्क्रिन शेअर केली. ऑनस्क्रीनच्या या जोड्या प्रेक्षकांच्या देखील तितक्याच पसंतीस पडल्या आहेत.
स्वप्नील जोशी, उमेश कामत, अंकुश चौधरी या कलाकारांसोबत मुक्ताने स्क्रिन शेअर केली. ऑनस्क्रीनच्या या जोड्या प्रेक्षकांच्या देखील तितक्याच पसंतीस पडल्या आहेत.
मुक्ता अजूनही सिंगल असल्यामुळे तिला अनेकदा तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर मुक्ताने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट उत्तरंही दिलं आहे. यावेळी मुक्ताने म्हटलं की, आता मी जितकी आनंदी आणि सुखी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढवणारा कुणी असेल तर मी नक्की लग्न करेन.
तिच्या या उत्तराची बरीच चर्चा होती. त्यामुळे मुक्ता लग्न कधी करणार या प्रश्नावरही पूर्णविराम मिळाल्याचं चित्र होतं.
मुक्ताने जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई २, मुंबई पुणे मुंबई ३ , डबल सीट , स्माईल प्लीज, मंगालाष्टक वन्स मोअर, डबल सीट यांसारख्या अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.
मुळची मुंबईची नसली तरीही मुंबई पुणे मुंबई या सिनेमातली मुंबईची गौरी ही प्रेक्षकांच्या आजही पसंतीस पडते. मुंबईत जेव्हा मुक्ता सुरुवातीला आली तेव्हा तिने अडचणींचा सामना करत इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं.
इतकंच नव्हे तर ज्या दिवशी मुक्ता मुंबईत आली त्याच दिवशी ती ट्रेनमधून पडल्याचा अनुभव देखील तिने सांगितला होता.
सध्या मुक्ताचं चारचौघी हे नाटकही रंगभूमीवर खूप गाजत आहे. (pc:muktabarve/ig)