Photos: युजवेंद्र चहल, धनश्री वर्माचा काडीमोड? कधी, कुठे अन् कशी झाली पहिली भेट? दोघांचीही फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी
दोघांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. तसेच, या चर्चा खऱ्या आहेत की, केवळ अफवा आहेत, याबाबतही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांनी इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. रिपोर्ट्सनुसार, हे कपल लवकरच घटस्फोट घेऊन वेगळं होऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.
पण, एखाद्या फिल्मी कहाणीप्रमाणेच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची प्रेमकहाणी आहे. तुम्हाला माहितीय हे दोघे एकमेकांना कुठे आणि कसे भेटले होते?
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या रिलेशनची बातमी 2020 मध्ये कोविड महामारीदरम्यान समोर आली होती. लॉकडाऊनमध्ये चहलनं धनश्रीकडे डान्स क्लास सुरू केला होता.
धनश्रीनं एका इंटरव्यूमध्ये बोलताना स्वतः सांगितलं होतं की, कोविड महामारीच्या काळात लॉकडाऊन असताना युजवेंद्रनं डान्स शिकण्यासाठी धनश्रीकडे संपर्क साधला होता.
युजवेंद्र त्याच्या फ्यूचर वाईफचा स्टुडंट बनला आणि डान्स क्लासच्या निमित्तानं झालेली त्यांची भेट लवकरच मैत्रीत बदलली.
युजवेंद्र आणि धनश्रीनं ऑगस्ट 2020 मध्ये साखरपुडा केला. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, लग्नाला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र आणि धनश्री यांची वेगळं होण्याच्या चर्चा फक्त अफवा नसून दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय.
चहल आणि धनश्रीनं इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. याशिवाय चहलनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून धनश्रीसोबतचे फोटोही डिलीट केले. तर धनश्री वर्मानं सर्व फोटो डिलीट केलेले नाहीत. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना वेग आला.
चहल आणि धनश्रीच्या जवळच्या व्यक्तींनी सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, त्यांच्या घटस्फोटाची बातमी खरी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोट होणार हे नक्की आहे फक्त ते अधिकृत होण्यासाठी फक्त काही वेळ लागेल. त्यांच्या विभक्त होण्याचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण हे स्पष्ट आहे की त्या दोघांनीही वेगळं होण्याचा आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.