Kangana Ranaut : 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' कंगनाचं वक्तव्य पुन्हा चर्चेत!
Kangana Ranaut : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. तिनं केलेली वक्तव्य चर्चेत असतात. सध्या कंगना तिच्या धाकड (Dhaakad) या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरला कंगनाच्या चाहत्यांची पसंती मिळाली. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कंगनानं बॉलिवूड स्टार्सबाबत वक्तव्य केलं आहे. तसेच तिनं दाक्षिणात्य अभिनेत्यांचं कौतुक देखील केलं.(photo:kanganaranaut/ig)
मुलाखतीमध्ये कंगनानं सांगितलं की, 'दाक्षिणात्य अभिनेत्यांबरोबर प्रेक्षक लवकर कनेक्ट होतात. ते त्यांच्या चाहत्यांसोबत कनेक्शन निर्माण करायचा प्रयत्न करतात. स्टार किड्स हे शिक्षणासाठी परदेशात जातात. तिथे इंग्रजीमध्ये बोलतात. हॉलिवूडचे चित्रपट पाहतात. काटा-चमच्याचा वापर करुन हे लोक खातात. मग प्रेक्षक यांच्यासोबत कनेक्ट कसे काय होऊ शकतात? त्यांचा लूक खूप वेगळा असतो. ते उकडलेल्या अंड्यासारखे दिसतात. त्यामुळे लोक त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकत नाहीत. मला त्यांना ट्रोल करायचं नाही. '(photo:kanganaranaut/ig)
'पुष्पाः द राइज' चित्रपटामधील दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं कंगनानं कौतुक केलं. ती म्हणाली की, बॉलिवूडमधील कोणताच अभिनेता असं काम करु शकणार नाही. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील 'पुष्पा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.(photo:kanganaranaut/ig)
कंगनाचा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'थलाइवी' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता तिचा धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(photo:kanganaranaut/ig)
या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता प्रमुख भूमिका साकारणार आहे. कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात कंगना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा हा सिनेमा आधी 27 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.(photo:kanganaranaut/ig)