अशी चीनी अभिनेत्री जिच्या सौंदर्यापुढे अनेकजणी फिक्या, तिच्या 'या' पाच वेब सिरीज पाहिल्यात का?
Zhao Lusi Top Shows: चीनची अभिनेत्री झाओ लुसी सध्या जगभरात चर्चेत आहे. तिने अभिनय केलेल्या वेब मालिका जगभरात आवडीने पाहिले जातात. तिच सौंदर्यही अनेकांना भुरळ घालणारे आहे. तिच्या टॉपच्या पाच वेब मालिका पाहूयात..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझाओ लुसीच्या या वेब सिरीज तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तसेच यूट्यूबवर पाहता येतील. यात पहिल्या क्रमांकाची वेब सिरीज 'हिडन लव' ही आहे. यात झाओ लुसी चेन झेयुआन या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसते. सीक्रेटली: अनएबल टू हाइड इट या पुस्तकावर ही वेबसिरीज आधारलेली आहे.
झाओ लुसीची भूमिका असलेली 'डेटिंग इन द किचन' ही वेबसिरिज 2020 साली आली होती. या सिरिजमध्ये तिच्यासोबत लिन शेन आणि यू शिन आदी अभिनेते आहेत. तुम्ही ही वेब सिरिज यूट्यूबवर पाहू शकता.
'द लॉन्ग बॅलाड' ही वेब सिरिज 2021 साली स्ट्रीम झाली होती. या वेब सिरिजमध्ये झाओ लूसी हिच्यासोबत दिलराबा दिलमुरत, लियो वू, लियू युनिंग आणि गेंग ले हे अभिनेते आहेत. तुम्हाला ही वेब सिरिज नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राइम वीडियो तसेच एमएक्स प्लेयरवर पाहता येईल.
'द रोमान्स ऑफ टायगर अँड रोज' या वेब सिरिजमध्येही झाओ लुसीने प्रमुख भूमिका निभावलेली आहे. या वेब सिरिजमध्ये डिंग युक्सी आणि शेंग यिंगहाओ हेदेकली आहेत. ही वेब सिरज एकूण 24 एपिसोड्सची असून 2020 साली ती रिलिज झाली होती. तुम्ही या वेब सिरिजला प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
'हू रूल्स द वर्ल्ड' ही वेबसिरीज 2022 साली रिलिज झाली होती. या वेब सिरिजमध्ये झाओ लुसी आणि यांग यांग यांची प्रमुख भूमिका आहे. यात ती एक मार्शल आर्टिस्टच्या रोलमध्ये दिसलेली आहे. नेटफ्लिक्सवर तुम्हाला ही वेब सिरिज पाहता येईल.
झाओ लुसी