Ankita Walavalkar Mehendi: ‘अपने ही रंग में...’, अंकिता वालावलकर अन् कुणालच्या मेहंदी कार्यक्रमाचे झक्कास फोटो पाहा

'बिग बॉस मराठी' फेम आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) लवकरच आपल्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अंकिता लवकरच (Ankita Walavalkar) कुणाल भगतसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. अंकिता आणि कुणालच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून, त्यांच्या लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे.

नुकताच अंकिता (Ankita Walavalkar) आणि कुणालचा मेहेंदी सोहळा पार पडला, या सोहळ्याचे फोटो अंकिताने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरती शेअर केले आहेत.
अंकिताने (Ankita Walavalkar) मेहेंदी सोहळ्यासाठी वेस्टर्न आऊटफिट घालते होते, आणि यामध्ये तिचा स्टाइलिश लुकचे फोटो देखील समोर आले आहेत.
अंकिताच्या हातावर कुणालच्या नावाची मेहेंदी रंगली असून, या सोहळ्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. अंकिता आणि कुणाल दोघेही कोकणात लग्न करणार आहेत.
त्यांच्या लग्नासाठी अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स, अंकिताची मित्रमंडळी, बीग बॉस मधील तिचे सगळे मित्र कोकणात पोहोचले आहेत. यामध्ये प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सर धनंजय पोवार (डीपी दादा) यांनाही अंकिताच्या लग्नासाठी कोकणात उपस्थिती लावली.