In Pics : सौंदर्यवती 'चंद्रा' अन् दौलतरावांची प्रेमकहाणी; दमयंतीची एन्ट्री, ‘चंद्रमुखी’चा जबरदस्त ट्रेलर
सौंदर्यवती 'चंद्रा' आणि खासदार दौलतराव देशमाने यांची निर्मळ प्रेमकथा म्हणजे 'चंद्रमुखी'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'चंद्रमुखी' (Chandramukhi) चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झालाय
'चंद्रा' आणि दौलतराव यांच्या प्रेमकहाणीत सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमानेची एन्ट्री झालीय.
ही भूमिका मृण्मयी देशपांडे साकारणार असून हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचा ट्रेलरवरून अंदाज येतोय.
29 एप्रिल रोजी 'चंद्रमुखी' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दौलतराव हा मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच 'चंद्रा'च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
चंद्रा, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा हा त्रिकोण पुढे कोणत्या वळणावर जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.
विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे.
प्रसाद ओकनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यात आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशेंसह तगडी स्टारकास्ट आहे.