BTS J-Hope : Jin नंतर बीटीएसचा दुसरा सदस्य जे-होप सैन्यातून परतला, Junkgook ने व्यक्त केली नाराजी
BTS J-Hope Military Discharged : बीटीएस सदस्य जे होप 17 ऑक्टोबरला सैन्यातून परतला आहे.(Image Source : Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीटीएस सदस्य जिननंतर जे होप सैन्यातून आवश्यक सेवा देऊन परतलेला दुसरा सदस्य आहे. बीटीएसमधील इतर पाच सदस्य सध्या सैन्यात भरती आहेत. ते जून 2025 मध्ये घरी परततील.(Image Source : Twitter)
बीटीएस मेंबर जे-होप 17 ऑक्टोबर रोजी त्यांची लष्करी सेवा पूर्ण करुन परताल असल्याचं बिग हिट म्युझिकने जाहीर केलं आहे. (Image Source : NewsEn/Twitter)
बिग हिट एजन्सीने चाहत्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव लष्करी कॅम्पला भेट देणे टाळण्याची विनंती केली होती. सैन्य दलातील भरतीच्या काळात जे-होपने प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. (Image Source : OSEN/Twitter)
बीटीएस सदस्य सुगा, आरएम, जिमीन, व्ही आणि जंगकूक हे इतर पाच बीटीएस सदस्य देखील त्यांची लष्करी कर्तव्ये पार पाडत आहेत.(Image Source : NewsEn/Twitter)
जे होप सैन्यातून परतल्यानंतर बॉय बँडचा सर्वात लहान सदस्य जंगकूक त्याच्यासाठी खूश असताना, तो काहीसा उदासही झाला आहे. (Image Source : NewsEn/Twitter)
दक्षिण कोरियातील शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पुरुषांना वयाच्या तिशीपर्यंत सुमारे दोन वर्ष राष्ट्रीय सेवेत काम करणं बंधनकारक असतं. 18 ते 28 वयोगटातील तरुणांना लष्करात 21 महिने, नौदलात 23 महिने किंवा हवाई दलात 24 महिने यापैकी एकाची निवड करावी लागते.
यानंतर त्याने काहीसं उदास होत लिहिलं, माझे आणि जिमीनचे आणखी 238 दिवस बाकी आहेत.
HYBE कंपनीने जे-होपचं जोरदार स्वागत केलं. (Image Source : Weverse/Twitter)
कोरियन बॉय बँड बीटीएसचे जगभरात चाहते आहेत. सात सदस्य असलेल्या या बॉय बँडचे बॉलिवूड सेलिब्रिटीही त्यांचे चाहते आहेत.(Image Source : OSEN/Twitter)