BTS 10th Anniversary : जगाला भुरळ पाडणारे BTS! बॉय बँडला 10 वर्षपूर्ण होण्याच्या निमित्तानं जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास
BTS 10th Anniversary : दक्षिण कोरियन बॉय बँड BTS नं तर तरुणाईला अगदी भुरळ पाडली आहे.
Continues below advertisement
BTS 10th Anniversary
Continues below advertisement
1/10
आज 13 जून रोजी BTS बॉय बँडला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या सात जणांच्या बँडने जागतिक स्तरावर आपली छाप पाडत दक्षिण कोरियाला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे.
2/10
बीटीएस (BTS) या कोरियन बॉय बँडचा चाहता वर्ग जगभरात पसरला आहे. जगभरात करोडोंच्या संख्येने लोक त्यांच्या गाण्यांवर थिरकतात.
3/10
13 जून 2013 साली BTS नं के-पॉप इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. यानंतर या 7 प्रतिभावान पोरांनी नाव काढलं.
4/10
10 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने BTS नं चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. BTS मेंबर्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, दोन बीटीएसचे सदस्य सैन्यात भरती आहेत.
5/10
10 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर बीटीएसने नवं 'Take Two' हे गाणं रिलीज केलं आहे. सोशल मीडियावर BTS वर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे.
Continues below advertisement
6/10
BTS नं त्यांची म्युझिक आणि डान्सने जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
7/10
BTSची गाणी आणि म्युझिक व्हिडीओला युट्यूबवर मिलियन्सच्या संख्येने लाईक आणि व्हयूज पाहायला मिळतात. यावरून त्यांच्या चाहत्यांचा आकडा किती आहे याचा अंदाज येईल.
8/10
जगभरातील असंख्य चाहते त्यांच्या आवडत्या के-पॉप सेलिब्रिटी (K-Pop Idol) ला भेटण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी दक्षिण कोरियाला भेट देतात.
9/10
BTS हा एक दक्षिण कोरियाई (Republic of Korea) म्युझिकल बॉय बँड ग्रुप (Kpop Boy Band) आहे. बीटीएस (BTS) म्हणजेच बांगतान बॉईज् (Bangtan Sonyeondan or Beyond the Scene) हा दक्षिण कोरियातील सुप्रसिद्ध बँड आहे.
10/10
या बँडमध्ये सात जणांचा समावेश आहे. यामध्ये किम सोकजिन (Jin), मिन युंगी (Min Yoongi), जंग होसोक (J-Hope), किम नामजून (Namjoon), पार्क जीमिन (Jimin), किम तेह्युंग (Taehyung), आणि जीओन जंगकूक (Jungkook) यांचा समावेश आहे.
Published at : 13 Jun 2023 01:56 PM (IST)