Shiv Thakare : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेचा प्रवास जाणून घ्या...
'बिग बॉस मराठी'मुळे घराघरांत पोहोचलेला शिव ठाकरे सध्या 'बिग बॉस 16' गाजवत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज शिवच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी याप्रवासापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.
शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' (MTV Roadies) या कार्यक्रमात दिसला होता.
मनोरंजनविश्वात येण्याआधी शिवने वृत्तपत्र विकण्याचे काम केले आहे.
शिव ठाकरेला 'बिग बॉस' हा कार्यक्रम प्रचंड आवडतो.
गेल्या सहा वर्षांपासून तो या वादग्रस्त कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची प्रतीक्षा करत होता.
शिवने त्याच्या घरातील भिंतीवर 'बिग बॉस 16'चा विजेता शिव ठाकरे, असं लिहिलं आहे.
मराठमोळा शिव ठाकरे जिंकावा यासाठी चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत.
शिव ठाकरे एक उत्तम खेळाडू आहे. तो जिद्दी असण्यासोबत प्रामाणिकपणे हा खेळ खेळतो आहे.
'बिग बॉस 16'चा विजेता शिव ठाकरे होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.