In Pics | Amitabh Bachchan यांच्यावर किती प्रेम करतेस? 'हे' होतं Rekha यांचं उत्तर

रेखा आणि अमिताभ बच्चन... यांच्या प्रेमाचे किस्से भन्नाट आहेत. त्याची चर्चा अजूनही होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमिताभ बच्चन आणि रेखा एकमेकांबद्दल खूपच कमी बोलतात. पण जेव्हा बोलतात त्यावेळी ते 'दिल खोलकर' बोलतात. त्यांनी आपल्या भावना सर्वांसमोर ठेवल्या आहेत, विशेषत: रेखा यांनी. रेखा यांनी आपल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं होतं.

एका मुलाखतीत रेखा यांना विचारण्यात आलं होतं की त्यांच अमिताभवर किती प्रेम आहे? यावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या की, जगभरात जेवढं प्रेम आहे त्यापेक्षाही जास्त अमिताभवर प्रेम आहे.
रेखा यांनी सांगितलं की, त्या आजपर्यंत अशा कोणत्याही व्यक्तीला भेटल्या नाहीत की जो अमिताभ बच्चन यांना पसंत करत नाही. मग अशा वेळी मी अमिताभ बच्चन यांना नापसंत कशी करु शकते असंही त्या म्हणाल्या
दोघांत काही व्यक्तिगत संबंध होते हे रेखा यांनी नाकारलं आहे. आमच्या दोघांत कोणतेही प्रेमसंबंध नव्हते असं रेखा यांनी स्पष्ट केलं..
जया बच्चन यांच्या सोबत असलेल्या संबंधावर रेखा यांनी प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, जया बच्चन यांच्या सोबत जसे पूर्वी संबंध होते तसेच संबंध हे आजही आहेत. रेखा आजही जया बच्चन यांना दिदी म्हणूनच हाक मारतात आणि आजही त्यांच्या भेटी होतात असंह रेखा यांनी स्पष्ट केलं.