प्रियंका आणि अक्षयची वाढती जवळीक पाहून ट्विंकल खन्ना जेव्हा चित्रपटाच्या सेट्सवर पोहोचली..

अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) नाव त्याच्या काळातील अनेक मोठ्या अभिनेत्रींशी जोडले जात होते. यामध्ये रवीना टंडन (Raveena Tandon), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) या अभिनेत्रींचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एक काळ असा होता की अक्षय कुमार आणि प्रियांकाची जोडी मोठ्या पडद्यावर खूप पसंत केली जात होती. दोघांनी 'मुझसे शादी करोगी', 'वक्त', 'अंदाज' आणि 'ऐताराज' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

असं म्हणतात की एकत्र काम करताना अक्षय आणि प्रियांका यांच्यामधील जवळीकता वाढली होती. त्यामुळे त्यांच्या रोमान्सची चर्चा होत होती. ही बातमी ट्विंकलपर्यंतही पोहोचली.
मीडिया रिपोर्टनुसार ट्विंकलने अक्षयला प्रियंकापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, पत्नी ट्विंकलचा हा सल्ला अक्षयने जास्त मनावर घेतला नाही.
असे म्हणतात की ट्विंकल आणि प्रियंका यांच्यात फोनवर भांडण झाले. अशा परिस्थितीत ट्विंकल प्रियंकाला समजावण्यासाठी 'वक्त' चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. इथं प्रियंका तर नाही मिळाली पण अक्षयबरोबर तिचे कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अक्षय कुमारने पुन्हा कधीही प्रियंकाबरोबर कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.