Vishakha Subhedar: विशाखा सुभेदारच्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाली...

‘शुभविवाह’ या मालिकेत विशाखानं (Vishakha Subhedar) रागिणी आत्या ही भूमिका साकारली.

(Vishakha Subhedar/Instagram)

1/8
अभिनेत्री विशाखा सुभेदारला (Vishakha Subhedar) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/8
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे विशाखाला विशेष लोकप्रियता मिळाली.
3/8
‘शुभविवाह’ या मालिकेत विशाखानं रागिणी आत्या ही भूमिका साकारली.
4/8
आता ‘शुभविवाह’ या मालिकेबाबत नुकतीच एक खास पोस्ट विशाखानं शेअर केली आहे.
5/8
विशाखानं सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलं, 'मिसिंग रागिणी..... शुभविवाह..! स्टारप्रवाह वर.. दुपारी दोन वाजता..! नव्या सिरीयल, नवीन भूमिकेतून, लगेचच इतका मोठा ब्रेक घेणं शक्य नसतं. पण खुप आधीपासून ठरलेला हा दौरा..त्यामुळे या डेटला मी नसणार.. हे माहित असूनही इतकी महत्वाची भूमिका मला दिलीत... माझा हा दौरा तुम्ही adjust केलात.खरंच तुमचे मना पासून आभार'
6/8
फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोमध्ये विशाखानं काम केलं.
7/8
मस्त चाललंय आमचं, ये रे ये रे पैसा-2, येड्यांची जत्रा या चित्रपटांमध्ये देखील विशाखानं काम केलं आहे.
8/8
विशाखाचा कॉमेडी अंदाज नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो.
Sponsored Links by Taboola