Vishakha Subhedar: विशाखा सुभेदार शेअर केले खास फोटो; म्हणाली...
सध्या तिचे कुर्रर्रर्रर्र हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कुर्रर्रर्रर्र या नाटकाची टीम सध्या या नाटकाचे प्रयोग परदेशात सादर करत आहे.
(Vishakha Subhedar/instagram)
1/8
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामुळे अभिनेत्री विशाखा सुभेदारला (Vishakha Subhedar) विशेष लोकप्रियता मिळाली.
2/8
सध्या तिचे कुर्रर्रर्रर्र हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कुर्रर्रर्रर्र या नाटकाची टीम सध्या या नाटकाचे प्रयोग परदेशात सादर करत आहे.
3/8
नुकतीच विशाखानं कुर्रर्रर्रर्र नाटकाच्या टीमचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
4/8
कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या टीमचे फोटो विशाखानं शेअर केले. या फोटोमध्ये नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे हे कलाकार विविध कामे करताना दिसत आहेत. नम्रता आणि विशाखा या फोटोमध्ये कपड्यांना इस्त्री करताना दिसत आहेत.
5/8
कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या टीमचे फोटो शेअर करुन विशाखानं पोस्टमध्ये लिहिलं, 'शोसाठी गेलोय. अनेक कामं स्वतः च करावी लागतात. इस्त्री, सेट, प्रॉपर्टी, lights, music, सगळे सगळे स्वतःच.आम्ही सगळेच या जबाबदाऱ्या पेलावतोय. थँक्यू टीम कुर्रर्रर्रर्र , प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, शशी केरकर, महेश सुभेदार! '
6/8
'थोडं दमतोय, झोपेचं खोबरं होतंय. पण परदेशातील आपल्या माणसांची कौतुकाची थाप खुप समाधान मिळवून देते आणि शेवटच्या फोटोमध्ये दर शोला थकलेले आम्ही पुन्हा एकदा सज्ज होतो पुढल्या प्रवासाला. ' असंही विशाखानं या पोस्टमध्ये लिहिलं.
7/8
विशाखानं शेअर केलेल्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
8/8
कुर्रर्रर्रर्र या नाटकामध्ये विशाखासोबतच प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
Published at : 11 Apr 2023 05:59 PM (IST)