'छावा'साठी विकी कौशल नव्हे तर 'हा' अभिनेता होता पहिली पसंत, विचारणाही झाली होती, पण...
छावा चित्रपट सध्या सगळीकडे गाजतोय. या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी विकी कौशल हा पहिली पसंत नव्हता.
Continues below advertisement
vicky kaushal and mahesh babu
Continues below advertisement
1/6
सध्या छावा या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला आहे.
2/6
या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या कामाचे देशभरातून कौतुक केले जात आहे.
3/6
महाराष्ट्रात तर या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतले आहे. आतापर्यंत आठ दिवसांत या चित्रपटाने 240 कोटींपेक्षा जास्त पैसे कमवले आहेत. अजूनही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड चालूच आहे.
4/6
दरम्यान, या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका केलेली असली तरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी सर्वांत अगोदर विकी कौशलचा विचार करण्यात आलेला नव्हता.
5/6
विकी कौशल ऐवजी सर्वांत अगोदर दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबू याला विचारणा झाली होती. मात्र महेशबाबूने हा चित्रपट करण्यात उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी विकी कौशल याच्याशी संपर्क साधला.
Continues below advertisement
6/6
विकी कौशलने मात्र ही संधी सोडली नाही. त्याने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. परिणामी आज हा चित्रपट सुपरहिट ठरण्याची शक्यता असून त्याची लोकप्रियताही वाढली आहे.
Published at : 22 Feb 2025 02:52 PM (IST)