Varun Dhawan: वरुण धवन वेस्टिब्युलर हायपोफंक्शन आजाराने लागण ; ट्वीट करत दिले हेल्थ अपडेट
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवननं (Varun Dhawan) देखील त्याच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवरूण धवन हा वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजाराचा सामना करत आहे. आपण लवकरच 100 टक्के बरे होऊ असे त्याने ट्वीट करत म्हटले.
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मेंदूला संदेश पाठववणारा कानाचा भाग व्यवस्थित काम करत नाही.
हा आजार कानाच्या आत एका भागात होतो, ज्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.
या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीचा चालताना तोल जाऊ शकतो.
गाडी चालवतानाही दिसण्यात आणि चालवण्यात अडथळा येतो.
काही प्रकरणांमध्ये, रुग्णांना मळमळ, चिंता, उलट्या देखील जाणवू शकतात. यासोबतच हळूहळू श्रवणशक्तीही संपुष्टात येऊ लागते.
व्हिएच म्हणजेच वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजारावर अनेक प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात.
अँटिबायोटिक्स किंवा अँटीफंगल उपचार किंवा अगदी शस्त्रक्रियेद्वारे देखील यावर उपचार केले जाऊ शकतात.
डॉक्टरांच्या सल्ला न घेता कोणत्याही आजारावर उपचार घेऊ नये.