Wedding Anniversary : सुखी संसाराचं पहिलं वर्ष! लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने वरुण धवनने शेअर केले खास फोटो

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. (PC : VarunDhawan/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्याने आपल्या लग्नाचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तो पत्नी नताशासोबत लग्न मंडपात दिसत आहे. (PC : VarunDhawan/IG)

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने 24 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच गेल्या वर्षी त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये होती. (PC : VarunDhawan/IG)
नताशासोबत लग्न केल्यानंतर वरुण संसारात चांगलाच रमला आहे. चित्रपटाच्या शूटिंगनंतर तो आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो. (PC : VarunDhawan/IG)
अभिनेत्याच्या या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. (PC : VarunDhawan/IG)
तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (PC : VarunDhawan/IG)