Tu Jhooti Main Makkaar: 'तू झूठी मैं मक्कार' नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; सात दिवसात केली एवढी कमाई

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar) चित्रपटातील श्रद्धा आणि रणबीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

पाच दिवस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर सहाव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घट झाली. आता या चित्रपटाच्या कमाईत सातव्या दिवशी वाढ झाली आहे.
सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने 76.24 कोटींची कमाई केली.
सातव्या दिवशी म्हणजेच 14 मार्चला 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाने 6.05 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने सात दिवसात 82.34 कोटींचे कलेक्शन केलं आहे.
'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाने सात दिवसात 82.34 कोटींचे कलेक्शन केलं. त्यामुळे आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे.
लव्ह रंजन लिखित आणि दिग्दर्शित 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाची निर्मिती लव्ह फिल्म्स आणि टी-सीरीज फिल्म्स यांनी केली आहे.