Father's Day 2021: करीना कपूर खानपासून कंगना आणि यामीपर्यंत या सेलिब्रिटींनी दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा
बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांना स्पेशल ट्रिब्यूट देताना दिसत आहेत. अनेकांनी आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करत त्यांच आयुष्यातील महत्व विशद केलं आहे. या सेलिब्रिटींनी सांगितले की वडिलांच्या पाठींब्यामुळेच ते आज लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. या स्टार्सच्या यशस्वी होण्यामागे त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामी गौतमने हा फोटो तिच्या वडिलांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल तिने वडिलांचे कौतुक केले आहे.
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतनेही तिच्या वडिलांसोबत हे छायाचित्र शेअर केले.
अनन्या पांडेने तिचे वडील चंकी पांडे यांच्याबरोबर थ्रोबॅकची छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले की हॅपी फादर्स डे पापा, तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आयुष्मान खुरानाने वडिलांसोबत काही मोनोक्रोम थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. त्याने लिहिले, की लहानपणी माझ्या वडिलांनी लादलेले निर्बंध मोडयला खूप मजा यायची. आता मोठे झाल्यावर माझ्यावर लादलेले निर्बंध मोडता येत नाहीत.
जान्हवी कपूरने हा जुना फोटो वडील बोनी कपूर यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत तिची बहीण खुशी कपूर देखील आहे.
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही फादर्स डेनिमित्त संस्मरणीय फोटो शेअर करुन वडिलांना ट्रिब्यूट दिला आहे.
माधुरी दीक्षितने तिच्या वडिलांसोबत एक फोटो शेअर करताना लिहिले की, ते माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
ट्विंकल खन्नाने फादर्स डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केलाय. यात अक्षय आपल्या मुलीसोबत दिसला आहे.
श्रुती हासनने वडील कमल हासन यांच्यासमवेत एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज आपण ज्या व्यक्तीकडून सर्वात जास्त शिकता आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्वात जास्त हसवलं आहे. तो तुमचा बाबा आहे. हॅप्पी फादर्स डे डॅडी.
करीना कपूरने तिचे वडील आणि सैफ अली खान यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने “सुपरहीरो” कॅप्शन दिलंय.
कंगना रनौतने हा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे, ज्यात तिने स्वत: साठी असे म्हटले आहे.