PHOTO : एवढी सुरक्षा मिळवण्यासाठी काय करावं लागेल? Kapil Sharma च्या प्रश्नावर Kangana Ranaut म्हणाली...

अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिने अनेक वादग्रस्त वक्तव्य करुन अनेकांशी पंगा घेतल्याचं दिसून आलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कंगना रनौतने नुकतंच आपल्या 'थलाईवी' या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show)' मध्ये भाग घेतला होता.

कपिल शर्मा आपल्या कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्याने कंगनाला विचारले की तुझ्या सोबत एवढी सिक्युरिटी का आली आहे? एवढी सिक्युरिटी प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला काय केलं पाहिजे?
त्यावर कंगनाने मजेदार उत्तर दिलं. ती म्हणाली की, आपल्याला केवळ सत्य बोलावं लागेल.
अभिनेत्री कंगना रनौत चा 'थलाईवी' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तिने चेन्नईतील मरीना बीच येथे मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे
कंगना रनौतचा 'थलाईवी' हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय यांनी केलं असून विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर. सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 10 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.