50 सेकंदाची फी 5 कोटी, ताफ्यात प्रायव्हेट जेट, अमाप संपत्तीची मालकीण SRK ची 'ही' हिरोईन
नयनताराच्या सौंदर्याबाबत जेवढं बोलू तेवढं कमीच. पण तिच्या सौंदर्याची किंमत जर ऐकलीत तर मात्र तुमच्या पायाखालची जमिन नक्की सरकेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाऊथच्या सर्वात महागड्या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये फक्त एकच ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. तरीही, 50 सेकंदाच्या कामासाठी ती 5 कोटी रुपये घेते. लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली नयनतारा अफाट संपत्तीची मालक आहे. आतापर्यंत तिनं प्रभास, शाहरुख खान सारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली आहे.
नयनतारानं दक्षिणेत अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर तिने शाहरुख खानसोबतचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
नयनतारानं तमिळ चित्रपटसृष्टीत जास्त काम केलं आहे. आपल्या दोन दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत तिनं 75 हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार अभिनयानं आपली छाप सोडली. आज नयनताराचा समावेश देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत झाला आहे.
नयनतारानं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मल्याळम चित्रपट 'मानसीनाक्करे' या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. यानंतर, अभिनेत्रीनं कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि अय्या, चंद्रमुखी, गजनी आणि बरेच हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत.
नयनताराचा 'बिल्ला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटानंतर ती स्टार बनली. 2010 मध्ये, तिनं चार दक्षिणात्य भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं. हे पाचही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. अधर्स (तेलुगु), बॉडीगार्ड (मलयालम), सिम्हा (तेलुगु), बॉस अंगिरा भास्करन (तमिल) आणि सुपर (कन्नड) मध्ये पाच बॉक्स ऑफिस हिट चित्रपट दिले.
नयनताराच्या सुपरडुपर हिट चित्रपटांमुळे अल्पावधीतच तिला 'लेडी सुपरस्टार'चा टॅग मिळाला.
नयनतारानं 2023 मध्ये शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं सर्व भाषांमध्ये एकूण 640.25 कोटी रुपयांचं कलेक्शन होतं. या चित्रपटानं जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराने टाटा स्कायच्या 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 5 कोटी रुपये आकारले होते. ही जाहिरात तमिळ, तेलगु, मल्ल्याळम आणि कन्नड भाषांसाठी 2 दिवसांत शूट करण्यात आला होता.
साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा खूपच आलिशान आयुष्य जगते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या ती प्रति सिनेमा 10 कोटी रुपये चार्ज करते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराचं एकूण नेट वर्थ 200 कोटी रुपये आहे.
अभिनेत्रीकडे कथितरित्या 50 कोटी रुपयांचं स्वतःचं एक प्रायवेट जेट आहे.
नयनतारानं प्रसिद्ध दिग्दर्शक विग्नेश सिवनसोबत लग्न केलं आहे.
नयनतारा आणि विग्नेश सिवन या दाम्पत्याला दोन मुलं आहेत.