Tamannaah Bhatia : 'बाहुबली' फेम तमन्नाचा 'सिंड्रेला' लूक; फोटोंनी वेधलं लक्ष
अभिनेत्री तमन्ना तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आथा पुन्हा एकदा तमन्ना नव्या लूकमुळे पुन्हा एकदा इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीने लाल गाऊनमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत. स्लीक पोनीटेल हेअरस्टाइलसह तमन्ना खूप सुंदर दिसत आहे.
रेड कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये तमन्ना भाटिया राजकुमारी दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने डायमंड इअररिंग्स घातले आहेत.
तमन्ना लाईटच्या मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह खूप ग्लॅमरस दिसत आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 32 वर्षांची आहे.
तमन्नाचा जन्म सिंधी कुटुंबात झाला, तिचे वडील संतोष भाटिया हिरे व्यापारी तर आई रजनी भाटिया गृहिणी आहे.
2005 साली तमन्नाने 'चाँद सा रोशन चेहरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
गायक अभिजीत सावंतच्या 'लफ्जों मे कह ना सकूँ' या म्यूझिक अल्बमध्येही तमन्ना झळकली आहे.
बॉलिवूडसोबतच तमन्नाने तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
2005 सालापासून अभिनय क्षेत्रात असलेल्या तमन्नाला खरी प्रसिद्धी 2015 साली आलेल्या 'बाहुबली' या बिग बजेट चित्रपटातून मिळाली.
तमन्नाचे भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत.
तमन्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार आतूर असतात.