Actress : वयाच्या 14 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण, पहिल्याच मोठ्या सिनेमासाठी लागली 8 वर्ष; वयाच्या 52व्या वर्षीही सिंगलच आहे 'ही' अभिनेत्री
बॉलिवूडच्या या यशस्वी अभिनेत्रीला तिच्या आयुष्यातला पहिला सिनेमा बनवण्यासाठी तब्बल 8 वर्ष द्यावी लागलीत. पण त्यानंतर तिने तिच्या अभिनयाने साऱ्यांचीच मनं जिंकून घेतलीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तब्बूच आहे. तब्बू 4 नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे.
फार कमी लोकांना माहित आहे की, तब्बूने वयाच्या 14व्या वर्षीच सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं.
तब्बूने तिच्या अभिनयाचा प्रवास देव आनंद यांच्या 'नौजवान' या सिनेमातून केला होता. त्यानंतर ती पहला-पहला प्यार या सिनेमात झळकली.
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या चित्रपटापूर्वी तिला संजय कपूरसोबत 'प्रेम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. पण हा चित्रपट बनवण्यासाठी दोघांना तब्बल 8 वर्षांचा कालावधी लागला.
पण त्यानंतर अभिनेत्री म्हणून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
आज तब्बू 52 वर्षांची आहे आणि ती चित्रपटांमध्येही खूप सक्रिय आहे. पण असं असलं तरीही तिने अद्यापही लग्न केलेलं नाही.