Swara Bhaskar : स्वरा भास्करला कॅब ड्रायव्हरने घातला गंडा
Swara Bhaskar
1/7
स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.
2/7
सध्या ती लॉस एंजलिसमध्ये (Los Angeles) गेली आहे. लॉस एंजलिसमध्ये फिरत असताना तिच्यासोबत एक घटना घडली आहे.
3/7
स्वरानं ट्वीमध्ये या घटनेबद्दल माहिती दिली आहे. स्वरानं ट्वीटमध्ये उबर या किंपनीच्या उबर सपोर्ट या अकाऊंटला टॅग केले आहे.
4/7
ट्वीटमध्ये स्वरानं लिहिले, 'हाय उबर, लॉस एंजलिसमध्ये एक कॅब ड्रायव्हर माझं सर्व समान घेऊन त्याच्या कारमधून निघून गेला. मी एका प्री- एडेड स्टॉपवर उभी होते. मला वाटतंय ही गोष्ट रिपोर्ट करण्यासाठी अॅपमध्ये काही फिचर नाहिये. माझं समान हरवलं नाही तर तो चक्क घेऊन पळून गेला. मला माझं सामान परत मिळू शकेल का? ' स्वरानं या ट्वीटमध्ये #touristproblems या हॅश टॅगचा वापर केला आहे.
5/7
स्वराची शीर कूरमा ही शॉर्ट फिल्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच फराज अंसारी यांनी दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटामध्ये देखील स्वरा महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात स्वरासोबतच शबाना आजमी आणि दिव्या दत्ता प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
6/7
'जहा चार यार' हा स्वराचा आगमी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
7/7
या चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे कथानक हे चार मैत्रीणींच्या आयुष्यावर आधारित आहे.
Published at : 24 Mar 2022 02:06 PM (IST)