Sugandha Mishra Baby Shower: सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले होणार आई-बाबा, थाटात पार पडलं अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाहा फोटो

सुगंधा मिश्राच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुगंधा आणि संकेत यांच्या कुटुंबाने तसेच त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली.

Sugandha Mishra Baby Shower

1/10
स्टँडअप-कॉमेडियन संकेत भोसले (Sanket Bhosle) आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) हे कपल सध्या चर्चेत आहे.
2/10
संकेत आणि सुगंधा यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुणाचे आगमन होणार आहे.नुकताच सुगंधाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
3/10
सुगंधा मिश्राच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुगंधा आणि संकेत यांच्या कुटुंबाने तसेच त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली.
4/10
सुगंधाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5/10
संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांनी सोशल मीडियावर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "आमचा बेबी शॉवर कार्यक्रम हा महाराष्ट्रीयन पारंपारिक पद्धतीने (डोहाळे जेवण) पार पडला. ओटी भरण, पूजा आणि बर्फी पेडा कार्यक्रम इत्यादी गोष्टी पार पडल्या. तसेच केक कटिंग देखील करण्यात आलं, डायपर चेंजिंग सारखे मजेशीर खेळ देखील आम्ही खेळलो."
6/10
पुढे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "आम्ही एका स्पेशल गाण्यावर परफॉर्म देखील केलं.आम्ही हे गाणं आमच्या बाळासाठी लिहिलं आहे. हे गाणं सुगंधाने लिहिलेले आणि संगीतबद्ध केले आहे. तसेच हे गाणं आम्ही दोघांनी गायलं आहे. ते लवकरच आम्ही तुमच्यासोबत शेअर करू"
7/10
संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांनी शेअर केलेल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. बेबीका धुर्वे,हेमंत थत्ते,गौहर खान, मुक्ती मोहन यांनी देखील संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांनी शेअर केलेल्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.
8/10
28 एप्रिल 2021 रोजी सुगंधा आणि संकेत यांचा विवाह सोहळा पार पडला. सुगंधा आणि संकेत हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
9/10
काही दिवसांपूर्वी सुगंधा आणि संकेत यांनी त्यांच्या खास समुद्रकिनाऱ्यावरील फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये सुगंधा ही तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.
10/10
संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा हे दोघेही त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात.
Sponsored Links by Taboola