स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत लगीनघाई, सायलीला लागणार अर्जुनच्या नावाची हळद!
स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा आणि ठरलं तर मग या मालिका अगदी रोमांचक वळणावर येऊन ठेपल्या आहेत. या मालिकांत सध्या लगीनघाई चालू झाली आहे.
star pravah tharla tar mag serial
1/6
स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेचं कथानक सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचलं आहे.
2/6
पुर्णा आजीच्या हट्टाखातर अर्जुन तन्वीशी लग्न करण्यासाठी तयार झालाय. अर्जुनने मनाविरुद्ध जाऊन हा निर्णय घेतला असला तरी सायलीने मात्र अर्जुन आणि तन्वीचं लग्न होऊ द्यायचं नाही हे मनाशी पक्क ठरवलं आहे.
3/6
त्यासाठीच वेश बदलून सायली लग्नाच्या विधींमध्ये सहभागी झाली आहे.
4/6
एकीकडे अर्जुन आणि तन्वीचा हळदी सोहळा सुरु असताना अर्जुनची उष्टी हळद मात्र सायलीला लागणार आहे. तू ही रे माझा मितवा मालिकेतल्या ईश्वरी आणि तिच्या बहिणीच्या प्लॅनमुळेच हे शक्य झालं आहे.
5/6
मेहंदी, संगीत सोहळा आणि आता अर्जुनच्या नावाची उष्टी हळद असं सारं काही आतापर्यंत सायलीच्या मनासारखं झालं आहे. त्यामुळे सायली आणि अर्जुनचीच लग्नगाठ बांधली जाणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
6/6
तेव्हा अर्जुन-सायलीच्या नात्याचा हा अनोखा प्रवास नव्या वेळेत म्हणजेच सायंकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
Published at : 10 Feb 2025 06:41 PM (IST)