Star Kids : शनाया कपूर ते पलक तिवारी, लवकरच ‘हे’ स्टारकिड करणार बॉलिवूडमध्ये धमाका!
शनाया कपूर ते पलक तिवारीपर्यंत अनेक बॉललिवूड स्टारकिड्स यंदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याच्या तयारीत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'रनवे 34’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पलक तिवारी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडिया क्वीन बनली आहे.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सुहाना झोया अख्तरच्या चित्रपटातून डेब्यू करू शकते.
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर देखील 2022 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. खुशी कपूर झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातूनही डेब्यू करू शकते.
अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर ‘बेधडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलीकडेच चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एका हिंदी वेब सीरिजमधून इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अगस्त्य, सुहाना खान आणि खुशी कपूर झोया अख्तरच्या चित्रपटाचा भाग असणार आहेत.