Pancham Da Songs : 'पंचम दा'अर्थात आरडी बर्मन यांची सर्वकाळ खास 'ही' दहा गाणी
पंचमदा यांनी 331 चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील म्हटली. यातील दहा सुपरहिट गाण्यांबाबत जाणून घेऊयात... यातलं पहिलं गाणं आहे 'आजा पिया तोहे प्यार दूं'. 'बहारो के सपने' चित्रपटातील हे गीत लता मंगेशकर यांनी गायलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'कटी पतंग' चित्रपटातील 'प्यार दिवाना होता है मस्ताना होता है', या गाण्याला चाहत्यांनी खूप डोक्यावर घेतलं होतं.
‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हे गीत देखील खूप पसंत केले गेले. '1942 लव्ह स्टोरी' चित्रपटातील हे गाणं आजही चाहते गुणगुणत असतात.
गोलमाल सिनेमातील 'आने वाला पल जानेवाला है', हे गाणं देखील चाहत्यांच्या ओठांवर असतं.
'अमरप्रेम' सिनेमात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित केलेलं 'कुछ तो लोग कहेंगे' हे गीत खूप गाजलं.
कुदरत चित्रपटातील 'हमें तुमसे प्यार कितना' हे गाणं आजही लोकांच्या आवडीचं आहे. मजरुह सुलतानपुरी यांनी हे गाणं लिहिलं होतं.
संगीतकार म्हणून पंचमदांचं 'यादो की बारात' सिनेमातील 'चुरा लिया है तुमने जो दिल को...' हे मोहम्मद रफी आणि आशा भोसलेंनी गायलेलं गाणं चाहत्यांच्या आवडीचं आहे.
मंजिल चित्रपटाला पंचमदांनी संगीत दिलं होतं. त्यातील बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं 'रिमझिम गिरे सावन' हे गीत खूप गाजलेलं.
शोले सिनेमातील 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे' या गीताला पंचमदांनी संगीत दिलं होतं. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन हे गाण्यात दिसतात..
मोहम्मद रफी यांनी गायलेलं 'क्या हुआ तेरा वादा' हे 'हम किसीसे कम नहीं' सिनेमातल्या गीताला देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं.