PHOTO : सिद्धार्थच्या मृत्यूने Shehnaz Gill वर दु:खाचा डोंगर कोसळला
Shehnaaz Gill,
1/7
बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लानं जगाचा निरोप घेतला.
2/7
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनं संपूर्ण बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
3/7
iसिद्धार्थ शुक्लाची जवळची मैत्रिण शहनाज कौर गिलला (Shehnaz Gill) या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शहनाजनं आपल्या वडिलांना सांगितलं की, 'माझ्या हातात त्यानं जीव सोडला, मी आता कसं जगू.'
4/7
अनेकदा शहनाजनं सिद्धार्थवरचं आपलं प्रेम जाहीर केलं होतं. सिद्धार्थच्या जाण्यानं ती पूर्णपणे कोलमडून गेली आहे.
5/7
शहनाज, सिद्धार्थला सकाळी झोपेतून उठवण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यानं रिस्पॉन्ड केलं नाही. त्यानंतर शहनाजनं सिद्धार्थच्या घरच्यांना बोलावलं.
6/7
शहनाजच्या वडिलांनी सांगितलं की, 'मला माझी मुलगी मुंबईत एकटी राहत असल्याची कधीच चिंता नव्हती. कारण सिद्धार्थ तिची खूप काळजी घ्यायचा.
7/7
सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. सिद्धार्थच्या पार्थिवाचं शवविच्छेदन झालं असून त्यासंदर्भातील अहवान मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सिद्धार्थचा पार्थिव रुग्णालयाच्या वतीनं कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
Published at : 03 Sep 2021 02:39 PM (IST)