Shefali Shah: शेफाली शाहनं सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव; म्हणाली...
अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकते. तिनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकत्याच एका मुलाखतीमध्ये शेफाली शाहनं तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितलं.
एका पॉडकास्टमध्ये शेफालीनं मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग या चित्रपटाबद्दल सांगितलं. या चित्रपटात तिने लहानपणी लैंगिक शोषण झालेल्या महिलेची भूमिका साकारली होती. यावेळी शेफालीनं तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला.
शेफाली म्हणाली, 'मला आठवतंय, मी एकदा बाजारात गेले होते, तेव्हा एक माणूस माझ्या जवळून गेला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. तो अनुभव खूप वाईट होता, मला त्याबद्दल विचार करुन खूप खराब वाटतं. मी याबद्दल काहीही बोलले नाही कारण'
शेफालीनं पुढे सांगितलं, अशा प्रसंगानंतर आपणच अपराधी आहोत, अशी भावना तुमच्या निर्माण होते , तुम्हाला लाज वाटते आणि तुम्हाला हे सर्व विसरावे असेही वाटते.'
शेफालीने 'गांधी माय फादर', 'दिल धडकने दो', 'ब्रदर्स', 'द जंगल बुक' आणि 'कमांडो' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
शेफाली शाह ही नुकतीच 'दिल्ली क्राइम', 'डॉक्टर जी' आणि 'डार्लिंग्स' या चित्रपट आणि सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. आलिया भट्टच्या 'डार्लिंग्स'चित्रपटात तिने घरगुती हिंसाचार पीडितेच्या आईची भूमिका साकारली होती.
शेफाली शाहचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. शेफालीचा ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
इन्स्टाग्रामवर शेफालीला 879K फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
शेफालीने 1998 मध्ये राम गोपाल वर्मी यांच्या सत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.