Shaheed Bhagat Singh : शहीद भगतसिंहांना कलेच्या माध्यमातून सलाम, भगतसिंहावर बनलेले हे सिनेमे नक्की पाहा

Continues below advertisement

भगतसिंह

Continues below advertisement
1/5
'अमर शहीद भगत सिंग' हा भगतसिंहांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमी बेदी यांनी केले आहे. दारासिंह, अचला सचदेव, सोमी दत्त, रजनीबाला यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे.
2/5
'रंग दे बसंती' हा भगतसिंहांवरील आधारित चित्रपट तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाचे संगीत ए आर रेहमान यांनी केले होते. या चित्रपटात अजय देवगण, सुशांत सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
3/5
1965 साली प्रदर्शित झालेला 'शहीद' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. चित्रपटात मनोज कुमार भगतसिंहाच्या भूमिकेतून दिसले होते. एस शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला 13 नॅशनल अॅवॉर्ड मिळाले होते. तर उत्कृष्ट चित्रपटाचा नरगिस दत्त पुरस्कारदेखील मिळाला होता.
4/5
'शहीदे आझाद भगत सिंह' हा चित्रपट 1954 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन जगदिश गौतम यांनी केले होते. प्रेम अबीद जयराज, स्मृती विश्वास, आशिता मुजुमदार हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. भगतसिंहाच्या निधनानंतर 23 वर्षांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित हा पहिलाच चित्रपट होता.
5/5
'शहीदे आझम' हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. हा देखील भगतसिंहावर आधारित असलेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात सोनू सूद भगतसिंहाच्या भूमिकेतून दिसून आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार अय्यर यांनी केले होते.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola