Pathaan : बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला कायम; सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण
Pathaan : आता पठाण या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण केले असून अजूनही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
Pathaan
1/10
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
2/10
25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच हिंदी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत.
3/10
आता 'पठाण' या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण केले असून अजूनही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
4/10
शाहरुखच्या 'पठाण'ने भारतात 500 कोटींची कमाई केली आहे.
5/10
भारतासह 20 देशांतील सिनेमागृहात 'पठाण' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
6/10
भारतातील 800 तर दुसरीकडे 20 देशांतील 135 सिनेमागृहांत 'पठाण' हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.
7/10
जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'पठाण' हा सिनेमा चांगलीच कमाई करत आहे.
8/10
शाहरुख खानचा अॅक्शन मोड, सिनेमातील गाणी, संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
9/10
'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.
10/10
रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 800 सिनेमागृहांत प्रदर्शित होणारा शाहरुखचा 'पठाण' हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे.
Published at : 15 Mar 2023 05:00 PM (IST)