Shah Rukh Khan: शाहरुखनं मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा; पाहा फोटो
चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहरुख (Shah Rukh Khan) हा त्याच्या मन्नत या बंगल्याच्या बाहेर आला होता.
shah rukh khan
1/8
बॉलिवूडचा किंग खान, अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे.
2/8
शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते, त्याच्या घराबाहेर त्याचे चाहते गर्दी करत असतात.
3/8
आज चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहरुख हा त्याच्या मन्नत या बंगल्याच्या बाल्कनीत आला होता.
4/8
मन्नत (Mannat) बाहेरील शाहरुखचे आणि अबरामचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5/8
चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहरुख हा त्याच्या मन्नत या बंगल्याच्या बाल्कनीत आला होता. यावेळी शाहरुख हा व्हाईट टि-शर्ट, ब्लॅक पँट आणि गॉगल अशा कूल लूकमध्ये दिसला.
6/8
शाहरुखनं त्याचा मन्नत बाहेरील फोटो ट्विटरवर शेअर केला.
7/8
शाहरुखनं या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'या उत्सवाच्या दिवशी तुम्हा सर्वांना पाहून खूप आनंद झाला! प्रेम पसरवूया. देवाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असो. ईद मुबारक.'
8/8
शाहरुखच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 22 Apr 2023 05:10 PM (IST)