Nora Fatehi च्या चमकत्या त्वचेचं गुपीत काय आहे?
'तेरे चेहरे में वो जादू है तेरी ओर चला आता हूं' नोरा फतेही (Nora Fatehi)वर या गाण्याच्या ओळी अगदी अचूक बसतात. (Photo Credit -Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकं तिला आणि तिच्या सौंदर्यतेला भुलून जातात. नोरा कुठेही जाते तेव्हा तिच्या सौंदर्याची आणि स्टाइलची खूप चर्चा होत असते. (Photo Credit -Instagram)
नोराची खास गोष्ट आहे की, तिला तिच्या चमकणाऱ्या त्वचेसाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. उलट खूप सोप्या पद्धतींचा वापर करून ती स्वत:ला दोन मिनटात तयार करते. (Photo Credit -Instagram)
नोरा चेहऱ्यावर लावायला दोन वेगळ्या शेड्स असलेल्या फाउंडेशनचा वापर करते. एक लाईट आणि एक डार्क. हे दोन्ही फाउंडेशन एकत्र करून लावल्याने एक परफेक्ट बेस नोरा फतेहीला मिळतो. (Photo Credit -Instagram)
हा परफेक्ट बेस तिच्या चमकत्या त्वचेचं रहस्य आहे. जो नोराला मॅट आणि सॉफ्ट लूक देतो. नोरा रोज याच पद्धतीचा मेकअप वापरते. (Photo Credit -Instagram)
नोरा तिचा लूक बऱ्याचदा लाईट शेड लिपस्टिकने पूर्ण करते. तिच्या पर्समध्ये चेहऱ्यावर लावायला पावडर आणि लाइट गुलाबी रंगाची लिपस्टिक नेहमी असते. (Photo Credit -Instagram)
नोराच्या सौंदर्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे तिचा आहार. नोरा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कोणतेही स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत नाही. उलट तिच्या मनात जेव्हा जे येईल तेव्हा ती खात असते. आवडीचं खाल्लेल्याचा आनंद नेहमी तिच्या चेहऱ्यावर दिसून येतो. (Photo Credit -Instagram)
नोरा ही उत्कृष्ट डान्सर असल्यानेच एवढी फिट आहे. नोरा बेली डान्स करत असल्याने तिला खास व्यायाम करायची गरज पडत नाही. (Photo Credit -Instagram)