Sankarshan Karhade: संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला...

संकर्षण (Sankarshan Karhade) हा सध्या त्याच्या नाटकामुळे नाही तर एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे.

Continues below advertisement

(Sankarshan Karhade /Instagram)

Continues below advertisement
1/9
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.
2/9
संकर्षण कऱ्हाडे हा नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.
3/9
संकर्षण हा गेल्या काही दिवांपासून “नियम व अटी लागू…” या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
4/9
संकर्षण हा सध्या त्याच्या नाटकामुळे किंवा शोमुळे नाही तर त्यानं शेअर केलेल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5/9
संकर्षणनं इन्स्टाग्रामवर त्याचा एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये त्याच्या हाताला दुखापत झालेली दिसत आहे. या फोटोला संकर्षणनं कॅप्शन दिलं, परवा रात्री माझ्यावर 4 (चार) गुंडांनी हल्ला केला. मी त्यांच्याशी 2 (दोन) हात केले. त्यात माझा 1 (एक) हात जखमी झालाय. ह्याची तुम्हाला 0 (शुन्य) कल्पना होती म्हणुन हा फोटो पोस्ट करतोय.' संकर्षणनं शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
Continues below advertisement
6/9
संकर्षणच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, '3 (तीन) वेळा सांगून ही ऐकत नाहीस... काळजी घे रे बाबा' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तुला मिळत असलेल यश बघवत नसेल ...'
7/9
संकर्षण हा लवकरच एका कुकिंग शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कुकिंग शोचे नाव 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) असं आहे.
8/9
संकर्षण हा 'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
9/9
माझी तुझी रेशिमगाठ, खुलता कळी खुलेना या मालिकांमध्ये संकर्षणनं काम केलं. तसेच त्यानं वेडिंग चा शिनेमा या चित्रपटात देखील संकर्षणनं काम केलं आहे.
Sponsored Links by Taboola