Bollywood Actor : बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्याने केली होती त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी, का झाली होती आयुष्याच्या शेवटाची जाणीव?
Bollywood Actor : संजीव कुमार यांना हिंदी सिनेसृष्टीतला सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी प्रत्येक सिनेमात प्रमुख भूमिका सोडून एखादी वठवणारी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केलाय.
Bollywood Actor
1/8
त्यांचं उत्तम सादरीकरण, सहज अभिनय यामुळे ते कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
2/8
पण याच सुपरस्टारच्या आयुष्यातला एका अनुभवामुळे साऱ्यांचेच हृदय हेलावून जाते.
3/8
संजीव कुमार यांनी बॉलीवूडच्या हरी भाईच्या नावाने देखील ओळखलं जातं. पण याच हरी भाईची अभिनयाचा कारकीर्द अगदीच छोटी होती. त्यांनी वयाच्या 47 व्यावर्षीच जगाचा निरोप घेतला.
4/8
विशेष म्हणजे त्यांना माहित होतं की ते 50 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगणार नाही आहेत. होय संजीव कुमार यांनी स्वत: त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती.
5/8
त्यांची ही भविष्यवाणी पुढे जाऊन खरी देखील ठरली. याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात अॅन अॅक्टर्स : द ऑथराइज्ड बायोग्राफी ऑफ संजीव कुमार या पुस्तकात लेखक हनीफ जाफरी यांनी केलाय.
6/8
हनिफ जाफरी यांनी यामध्ये संजीव कुमार आणि तबस्सुम यांच्यातील संभाषणाचा खुलासा केला आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही वयाने अजून लहान आहात, तरी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी वृद्ध व्यक्तीची भूमिका अगदी सहजरित्या कशी साकारली आहे?
7/8
यावर त्यांनी फार धक्कादायक उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, मी म्हातारा नाही होणार. कारण मी माझ्या परिवारातील इतर पुरुषांप्रमाणे 50 वर्षांपेक्षा जास्तीचं आयुष्य जगणार नाही. त्यामुळे मी स्क्रिनवर म्हातारपणाचा देखील अनुभव घेतला आहे.
8/8
संजीव कुमार यांचे 6 नोव्हेंबर 1985 रोजी 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
Published at : 05 Apr 2024 01:16 PM (IST)