PHOTO: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या संजना सांघी बद्दलच्या या खास गोष्टी!
'दिल बेचारा' या चित्रपटातून लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री संजना संघी हिची फिल्मी कारकीर्द खूपच रंजक राहिली आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजनाने पहिल्यांदाच इम्तियाज अलीच्या 'रॉकस्टार' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
2 सप्टेंबर 1996 रोजी नवी दिल्ली येथे जन्मलेल्या संजनाचे बालपणापासूनच रंगभूमीशी नाते आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
संजनाच्या आजोबांचे चांदणी चौकात एक थिएटर आहे, ज्याचे नाव 'मोती सिनेमा' आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
तिला सुरुवातीपासूनच अभिनयाचे खूप आकर्षण होते.पण अभिनेत्रीला अभिनय क्षेत्रात येण्यास उशीर झाला. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
संजना संघीला आठवीमध्ये पहिला ब्रेक मिळाला. ती तिच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी परफॉर्म करत होती, तेव्हा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांची नजर तिच्यावर पडली. यानंतर त्याने तिची क्लिप इम्तियाज अलीला पाठवली.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
इम्तियाजला संजनाची शैली खूप आवडली आणि त्यामुळे तिला चित्रपटात ब्रेक मिळाला.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
यानंतर अभिनेत्री 'बार बार देखो', 'फुक्रे रिटर्न्स' आणि 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
2020 मध्ये संजना संघीला मुकेश छाबरा यांच्या 'दिल बेचारा' या चित्रपटात पहिल्यांदा मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात ती अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. या जोडीला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
या चित्रपटानंतर संजनाची फॅन फॉलोइंग खूप वाढली. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला 10 वेळा ऑडिशन द्यावे लागले होते. संजना अलीकडेच आदित्य रॉय कपूरसोबत 'ओम - द बॅटल विदीन'मध्ये दिसली होती. आता लवकरच ती 'धक धक' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर थिरकताना दिसणार आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)