Salman Khan : 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमानचं लग्नाबाबत मोठं वक्तव्य
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे.
'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही.
'बिग बॉस 16'चा महाअंतिम सोहळा पार पडला असून या कार्यक्रमात सलमान खानने लग्न न करण्याबाबत भाष्य केलं आहे.
सलमानच्या या वक्तव्यावर 'भाईजानला लग्न करायचं आहे का?', 'संसार करायचा आहे का?' असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या सिनेमांसह रिलेशनमुळे देखील अनेकदा चर्चेत असतो.
संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, यूलिया वंतूर सारख्या अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनमध्ये होता.
भाईजानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.