Salman Khan Birthday: 57 वर्षाचा झाला बॉलिवूडचा भाईजान; सलमानची पहिली कमाई माहितीये?
बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा आज 57 वा वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला शुभेच्छा देत आहेत.
सलमानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.
सध्या कोट्यवधींचा मालक असणाऱ्या सलमानची पहिली कमाई ही 75 रुपये होती.
मुंबईतील ताज हॉटेमधील एका शोमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सलमाननं काम केलं. या कमाचे सलमानला 75 रुपये मिळाले.
रिपोर्टनुसार, सलमाननं मैने प्यार किया या हिट चित्रपटासाठी 31 हजार रुपये मानधन घेतलं.
प्यार किया, साजन, हम आपके हैं कौन, करण-अर्जुन, जुडवा, प्यार किया तो डरना क्या. दबंग, बॉडीगॉर्ड, एक था टाइगर, बजरंगी भाईजान या हिट चित्रपटांमध्ये सलमाननं काम केलं.
सलमान त्याच्या फिटनेसनं, स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
त्याचा टायगर-3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.