PHOTO : सलमानसोबतच्या नात्यावर Sangeeta Bijlani म्हणते, 'दोस्ती की है, तो निभानी तो पडेगी ही'
अभिनेत्री संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या एकेकाळी सुरु असलेल्या अफेयरची चर्चा आजही चांगलीच रंगते. या दोघांचं नातं अगदी लग्नापर्यंत पोहोचलं होतं. (photo:@Sangeeta Bijlani/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. पण नंतर असं काही झालं की या दोघांच्यात बिनसलं आणि नातं तुटलं. (photo:@Sangeeta Bijlani/FB)
एका मुलाखतीत संगीता बिजलानीने सलमानसोबतच्या या नात्यावर पुन्हा एकदा भाष्य केलं असून ती म्हणाली की, 'दोस्ती की है, तो निभानी तो पडेगी ही'. (photo:@Sangeeta Bijlani/FB)
काही कनेक्शन असे असतात की ते आपण तोडू शकत नाही असं सांगत संगीताने आपण अजूनही सलमानच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे. (photo:@Sangeeta Bijlani/FB)
'कॉफी विथ करण' या शो मध्येही सलमानने संगीता बिजलानी आणि त्याच्या नात्याची कबुली दिली होती आणि आपल्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती असं सांगितलं होतं. (photo:@BeingSalmanKhan/FB)
आपण सध्या अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीच्या संपर्कात असून तिच्यासोबत जगभर फिरतोय असंही संगीता बिजलानी म्हणाली.(photo:@Sangeeta Bijlani/FB)
सलमानशी नातं बिघडल्यानंतर संगीता बिजलानीने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केलं.