सलमान खानसोबत हिट चित्रपट देणारी अभिनेत्री; एका शस्त्रक्रियेनंतर बदललं आयुष्य
बॉलिवूडमध्ये खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांना अल्पावधीत यश मिळते. पण अचानक मिळालेल्या यश प्रत्येकालाच राखता येतं असं नाही. फिल्म इंडस्ट्रीची अशीच एक अभिनेत्री आहे आयशा टाकिया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयशा टाकियाने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. तिने सलमान खानसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. आयशाचा 'वॉंटेड' मधील अभिनयही प्रेक्षकांना आवडला होता आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
आयशा टाकियाने बाल कलाकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. 90 च्या दशकात ती एका जाहिरातीमध्ये दिसली होती. आयशाने आपलं सौदर्य आणि निरागसपणाने प्रेक्षकांना वेड लावलं.
मोठी झाल्यानंतर आयशाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. फाल्गुनी पाठक यांनी गायलेल्या 'मेरी चुनर उड़-उड़ जाए' या गाण्यातही ती दिसली.
चित्रपटांमध्ये आपली कारकीर्द संपुष्टात येत असल्याचे पाहून आयशा टाकिया बॉलिवूडपासून दूर गेली. तिने फरहान आझमीशी लग्न केले होते. फरहान हा एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आयशाने चेहर्यावर शस्त्रक्रिया केली होती. मात्र, दुर्दैवाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही आणि तिच्या चेहऱ्याचे नुकसान झाले. त्यानंतर तिचं बॉलिवूडमध्ये कमबॅक होणे अशक्य होऊन गेलं.