Salaar Trailer Out : जबरदस्त डायलॉग्स अन् अॅक्शन सीन्स; प्रभासच्या 'सालार'चा ट्रेलर पाहून येतील अंगावर शहारे

Salaar Trailer Out: सालार चित्रपटाच्या या दुसऱ्या ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.

Salaar Trailer Out

1/8
प्रभासच्या (Prabhas) सालार (Prabhas) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सालार या चित्रपटाचा हा दुसरा ट्रेलर आहे. या आधी देखील या चित्रपटाचा एक ट्रेलर रिलीज झाला होता.
2/8
प्रभासच्या सालार या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.
3/8
सालार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रभास हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.
4/8
सालार या चित्रपटाच्या 2.53 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्स बघून तुमच्या अंगावर शहारे येतील. या ट्रेलरमध्ये खानसार नावाच्या गावाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. "खानसार की कहानी तब बदली जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए" हा डायलॉग सालार या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकू येतो.
5/8
सालार चित्रपटाच्या या ट्रेलरमधील श्रुती हसनच्या (Shruti Haasan) लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/8
अभिनेता प्रभासनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सालार चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरची माहिती चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "खानसाराच्या हिंसक जगात प्रवेश करा"
7/8
सालार चित्रपटाच्या ट्रेलरमधील पृथ्वीराज सुकुमारनच्या (Prithviraj Sukumaran) लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
8/8
22 डिसेंबस रोजी प्रभासचा सालार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगु, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा रनटाइम 2 तास आणि 55 मिनिटे एवढा असणार आहे.
Sponsored Links by Taboola