OTT Famous Actors : कुणी 10 कोटी तर कुणी 15 कोटी... ओटीटी विश्वात काम करण्यासाठी कलाकार आकारतात ‘इतके’ मानधन!
भारतात OTT प्लॅटफॉर्मची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात ओटीटीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. यामुळेच लोक OTT प्लॅटफॉर्मकडे वळले. बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील मोठे स्टार्सही वेब सीरीज आणि डिजिटल फिल्म्सचा भाग बनत आहेत. या सीरीज आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी हे कलाकार तगडी फी आकारतात. चला जाणून घेऊया कोण आहेत ओटीटीचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आणि अभिनेत्री...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेता सैफ अली खान ‘तांडव’ आणि ‘सेक्रेड गेम’ अशा वेब सीरीजमध्ये दिसला होता. सैफने या सीरीजमध्ये काम करण्यासाठी तब्बल 15 कोटी आकारले होते.
मोठ्या पडद्याप्रमाणेच, ओटीटीवरही चमकलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी ओटीटीच्या प्रत्येक सीरीज आणि चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेतो.
‘फॅमिली मॅन’ फेम अभिनेता मनोज वाजपेयी प्रत्येक एपिसोडसाठी 25 लाख रुपये मानधन आकारतो. ‘फॅमिली मॅन’ व्यतिरिक्त, मनोज वाजपेयी ‘मिसेस सीरियल किलर’, ‘डायल 100’, ‘सायलेन्स कॅन यू हिअर मी’ सारख्या ओटीटी प्रोजेक्ट्सचा भाग बनला आहे.
बॉलिवूडनंतर आता ओटीटी किंग बनलेले पंकज त्रिपाठी प्रत्येक सीरीजसाठी 10 ते 12 कोटी रुपये आकारतात.
‘स्कॅम 1992’, ‘ग्रेट इंडियन मर्डर’, ‘मॉडर्न लव्ह मुंबई’ फेम अभिनेता प्रतीक गांधी प्रत्येक एपिसोडसाठी 5 लाख रुपये फी आकारतो.
पंचायत अभिनेता जितेंद्र कुमार प्रत्येक एपिसोडसाठी 4 लाख रुपये घेतो.
‘मिर्झापूर’ फेम अभिनेता अली फझलदेखील प्रत्येक एपिसोडसाठी 12 लाख रुपये आकारतो.
ओटीटी प्लॅटफॉर्मची लाडकी अभिनेत्री राधिका आपटे प्रत्येक सीरीजसाठी 4 कोटी रुपये मानधन घेते.
‘फॅमिली मॅन’ या सीरीजमधील अभिनेत्री प्रियामणीने प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाख रुपये घेतले आहेत.